पारडी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदा मनगटे यांनी 30 ऑक्टोबरला रात्री 8 वाजताच्या सुमारास दिलेल्या माहितीनुसार, घरफोडीचा प्रयत्न करीत असताना आवाज झाल्याने नागरिक जागे झाले दरम्यान पळत असताना आरोपीने एका महिलेला धक्का दिला. याप्रकरणी पारडी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून आरोपीला ताब्यात घेतले. आरोपी विरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहे याबद्दलची अधिक माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदा मनगटे यांनी दिली आहे.