भंडारा: तहसील कार्यालयातील 'जनता दरबार' अधिकारी विरहित; संतापलेल्या शेतकऱ्यांचा तहसील कार्यालयात ठिय्या!
भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तहसील कार्यालयात आज दिनांक ३ नोव्हेंबर रोजी दुपारी १ वाजता दरम्यान मोठा गोंधळ उडाल्याचे चित्र दिसून आले. पालकमंत्र्यांच्या आदेशानुसार दर आठवड्याला सोमवारी आयोजित करण्यात येणाऱ्या 'जनता दरबारा'त एकही अधिकारी उपस्थित नसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली. अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीमुळे नाराज झालेल्या शेतकऱ्यांनी थेट तहसील कार्यालयात घुसून राज्य सरकारविरोधात घोषणाबाजी केली. "पालकमंत्री मुर्दाबाद", "शेतकऱ्यांना न्याय द्या" अशा घोषणा देत शेतकऱ्यांनी आपला...