सुरगाणा: बाऱ्हेसह तालुक्यात झालेल्या नुकसानग्रस्त भागाची खा. भास्कर भगरे यांनी भेट देऊन केली पाहणी
मागील आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीने सुरगाणा तालुक्यात भात शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून खा. भास्कर भगरे यांनी नुकसानग्रस्त भागाला शासकिय अधिकाऱ्यां समवेत भेटी देऊन पाहणी करत पंचनामा करून प्रस्ताव सादर करण्याच्या सुचना दिल्या.