मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने यांच्या आदेशानुसार पश्चिम झोनतील डाबकी रोडवरील रेणुका नगर, वॉर्ड बी-6 मधील मालमत्ता क्र. 345 वर 2017-18 पासून थकित असलेल्या 2,25,551 करापोटी दिनांक 5 डिसेंबर रोजी सीलची कारवाई करण्यात आली. ही कारवाई अतिरिक्त आयुक्त सुमेध अलोने, उपायुक्त विजय पारतवार, सहा. गजानन घोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.कर अधीक्षक राजेश जाधव व पथकाच्या उपस्थितीत पार पडली.ही माहिती सायंकाळी 6 वाजता मनपा प्रशासनाने प्रसिद्धीपत्रका द्वारे दिली.