वर्धा: तंबाखु मुक्त युवा अभियान अंतर्गत आता होणार तंबाखूजन्य पदार्थ खाणा-यांवर कारवाई:जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुमंत वाघ
Wardha, Wardha | Oct 28, 2025 राष्ट्रीय तंबाखु नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात 9 ऑक्टोंबर पासुन 9 डिसेंबर पर्यंत तंबाखु मुक्त युवा अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुमंत वाघ याच्या मार्गदर्शनात सामान्य रुग्णालय परिसरात तंबाखु व तंबाखुजन्य पदार्थ खाणा-यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली तर काहींना समज देऊन सोडण्यात आले. सदर कारवाई राष्ट्रीय तंबाखु नियंत्रण कार्यक्रमाच्या जिल्हा सल्लागार डॉ. नम्रता सलूजा, समुपदेशक राहुल बुचुंडे, हर्षद ढोबळे व जिल्हा सामान्य रुग्णालयातील अधिकारी