जळगाव: कोल्हे नगर परिसरात अल्पवयीन मुलीवर अत्याचार; दोन जणांना अटक, रामानंद नगर पोलीसात गुन्हा दाखल
जळगाव शहरातील कोल्हे नगर परिसरात एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला पैशांचे आमिष दाखव अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीला आला आहे. या अत्याचारातून पिडीत मुलगी ही गर्भवती राहिली. याबाबत शनिवारी १३ सप्टेंबर सायंकाळी ७.३० वाजता रामानंद नगर पोलीस ठाण्यात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील दोन जणांना अटक करण्यात आला आहे.