शासनाच्या मालकीच्या गौण खनिजाची विनापरवाना चोरी करणाऱ्यांविरुद्ध स्थानिक गुन्हे शाखेने धडक कारवाई सुरू केली असून, मौजा डोंगरगाव (साक्षर) शिवार परिसरात विनापरवाना रेतीची वाहतूक करताना एका आरोपीला रंगेहात पकडण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ८ जानेवारी रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास उमेश अशोक गभणे (वय ३२, रा. गुरढा, ता. लाखनी) हा आपल्या ताब्यातील ट्रॅक्टरमध्ये चोरटी रेती भरून नेत असताना ही कारवाई करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखा भंडारा येथील पोलीस हवादार यांच्या तक्रारीवरून पालांदूर.