हातकणंगले: डॉ.रत्नाप्पाण्णा कुंभार यांचे स्वातंत्र्य संग्रामात देशासाठी मोठे योगदान आमदार राहुल आवाडे यांचे प्रतिपादन
पंचगंगा सहकारी साखर कारखाना,गंगानगरचे संस्थापक, स्वातंत्र्यसैनिक आणि पद्मश्री पुरस्कार प्राप्त डॉ.रत्नाप्पाण्णा कुंभार यांच्या ११६ व्या जयंतीनिमित्त त्यांच्या समाधीस्थळी आज सोमवार दिनांक 15 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता आमदार राहुल आवाडे यांनी समाधीस्थळी भेट देऊन त्यांना विनम्र अभिवादन केले.यावेळी आमदार आवाडे म्हणाले, “डॉ.रत्नाप्पाण्णा कुंभार यांनी स्वातंत्र्य संग्रामात सक्रिय सहभाग घेऊन देशासाठी मोठे योगदान दिले.स्वातंत्र्यानंतर त्यांनी सहकार क्षेत्रात मोठे काम केले.