जालना: राज्यात प्रत्येक पोलीस ठाण्यात ‘विशेष बाल पोलीस पथक’ अनिवार्य
बालहक्क आयोगाचे निर्देश; वाढत्या गुन्ह्यांवर कठोर पाऊल..
Jalna, Jalna | Apr 20, 2026 राज्यात प्रत्येक पोलीस ठाण्यात ‘विशेष बाल पोलीस पथक’ अनिवार्य बालहक्क आयोगाचे निर्देश; वाढत्या गुन्ह्यांवर कठोर पाऊल.. आज दिनांक 20 सोमवार रोजी सकाळी 10 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना राज्यातील अल्पवयीन मुला-मुलींवरील वाढत्या गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोगाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राज्यातील प्रत्येक पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक कार्यालय तसेच सर्व पोलीस ठाण्यांमध्ये ‘विशेष बाल पोलीस पथक कक्ष’ स्थापन करण्याच्या वैधानिक सूचना देण्यात आल्या आहे