अलिबाग: अलिबाग स्थानकातील स्लॅब कोसळला
सुदैवाने जिवीतहानी टळली
Alibag, Raigad | Nov 7, 2025 अलिबाग एसटी बस स्थानकातील प्रवासी प्रतीक्षा कक्ष आरक्षण कक्ष आणि कॅन्टीन जवळील स्लॅब शुक्रवार सायंकाळी कोसळला.सुदैवाने जिवीतहानी टळली .या घटनेने स्थानकातील इमारतीच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे .64 वर्ष जुने असलेल्या अलिबाग अलिबाग स्थानकाच्या जागी नवीन इमारत बांधण्याची हालचाल सहा वर्षांपूर्वी झाली होती. 28 ऑगस्ट 2019 मध्ये कामाचे भूमिपूजन मोठ्या थाटामाटात करण्यात आले. अद्ययावत अशा पद्धतीने स्थानकात इमारत निर्माण होणार होती.