जालना: अखेर मौजपुरी येथील जिल्हा परिषदेच्या शाळा खोलीचे बांधकाम सुरु; गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबीत होते काम
Jalna, Jalna | Jul 6, 2026 जालना तालुक्यातील मौजपुरी येथील जिल्हा परिषद शाळा खोलीच्या बांधकामाला अखेर आज सुरुवात झाली. सोमवार दि. 6 जुलै 2026 रोजी दुपारी 4 वाजता मिळालेल्या माहितीनुसा गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबीत असलेल्या शाळा खोलीच्या बांधकामाला गावकर्यांच्या उपस्थितीत सुरुवात करण्यात आली. मौजपुरी येथील जिल्हा परिषद शाळेची इमारत गेल्या अनेक वर्षांपासून अत्यंत जीर्ण अवस्थेत असून,मागील वर्षी शाळेच्या इमारतीचा स्लॅब कोसळल्याची घटना घडली होती. सुदैवाने त्या वेळी विद्यार्थी उपस्थित नसल्याने जीवित हानी टळली होती.