वर्धा जिल्ह्याचा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यामध्ये समावेश आहे. जिल्ह्यात विविध कारणाने शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहे. या आत्महत्या थांबविण्यासाठी शासनामार्फत विविध योजना राबविण्यात येत आहे. त्याची योग्य अंमलबजावणी करा. शेतकऱ्यांच्या जनावरांना मोफत चारा उपलब्ध करुन देण्यासाठी कृषि, पशुसंवर्धन, वन व ग्रामविकास विभागाने एकत्रित प्रयत्न करावे, अशा सूचना कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष ॲङ निलेश हेलोंडे पाटील यांनी केल्या.