पाटोदा: पिकप च्या धडकेत पायी जाणाऱ्या तरुणाचा मृत्यू ,मांजरसुंबा पाटोदा महामार्गावरील घटना
Patoda, Beed | Oct 11, 2025 पायी जात असणाऱ्या एका तरुणास पाठीमागून पिकअपने जोराची धडक दिल्याने या अपघातात जखमी तरुणास उपचारार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारा दरम्यान सदरील तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना मांजरसुंबा-पाटोदा रस्त्यावर घडली. पप्पू विश्वंभर वाघमारे (रा. सौंदाना, वैद्यकिन्ही ता. पाटोदा) हा तरुण मांजरसुंबा ते पाटोदा रोडने पायी जात असताना त्यास पाठीमागून पिकअप (क्र. एम.एच. 12 एच.एक्स. 3706) ने जोराची धडक दिली. या अपघातात सदरील तरुण गंभीररित्या जखमी होऊन उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे.