भंडारा: डोकेदुखीच्या त्रासाला कंटाळून भावड येथील महिलेची गळफास घेऊन आत्महत्या
भंडारा जिल्ह्यातील भावड येथील रहिवासी असलेल्या मंगला एकनाथ चिचमलकर (वय 47) यांनी भावड येथे गळफास घेऊन आत्महत्या केली. डोकेदुखीच्या त्रासाला कंटाळून त्यांनी हे पाऊल उचलल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मंगला चिचमलकर यांना डोकेदुखीचा त्रास होत असल्याने त्या त्यांच्या मामाकडे राहत होत्या. 13 सप्टेंबर रोजी सकाळी 8:30 ते 10:00 या वेळेत त्या घरात एकट्याच होत्या. त्यांचे कुटुंबीय कामानिमित्त बाहेर गेले होते. घरी परत आल्यावर त्यांना बेडरूमचा दरवाजा आतून बंद दिसला