शेगाव: आर्वी येथून अट्टल दुचाकी चोरटा पोलिसांच्या जाळ्यात
शेगाव शहर आणि परिसरात वाढत्या दुचाकी चोरीच्या घटनांवर आळा घालण्यासाठी शहर पोलिस ठाण्याच्या गुन्हे पथकाने १९ सप्टेंबर रोजी रात्री १० वाजे दरम्यान मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत अट्टल दुचाकी चोर योगेश नामदेव बावणे ( ४०) रा. टाकरखेडा, ता. आर्वी, जि. वर्धा याला अटक करण्यात आली असून, चोरीची त्याच्याकडून एक मोटारसायकल जप्त केली आहे. दिनेश धंदर रा. आळसना, ता. शेगाव यांची एम.एच. २८ एके ३७९१ क्रमांकाची दुचाकी एसबीआय बँकेसमोरून चोरी झाली होती.