कळमनूरी: कारच्या धडकेत दोन बैल जागेवरच ठार,कामठा फाटा शिवारातील घटना
हिंगोली नांदेड या राष्ट्रीय महामार्गावर साळवा येथील शेतकरीआपले दोन बैल कामठा फाटा येथील शनिवार बाजारात घेऊन जात असताना कार क्र . एम एच 37 व्ही 2570 च्या चालकांने बैल रस्ता ओलांडत असताना त्या जोराची धडक दिली यामध्ये दोन बैल जागेवरच ठार झाल्याची घटना घडली आहे .यावेळी बैल मालकाला मोबदला दिल्यानंतर हा वाद संपुष्टात आला असून याप्रकरणी आज दि . 12 ऑक्टोबर रोजी सकाळ पर्यंत पोलिसात कुठल्याही गुन्ह्याची नोंद घेण्यात आली नव्हती .