सेनगाव: सवना सर्कल मधील अनेक कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश
सेनगांव तालुक्यातील सवना सर्कल मधील अनेक कार्यकर्त्यांनी आज शिवसेना नेते तथा माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगांवकर यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे. यावेळी शिवसेनेचे तालुकाप्रमुख अमोल खिल्लारी,उप तालुकाप्रमुख शिवा पाटील यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी,कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी वाजत-गाजत सवना सर्कलमधील कार्यकर्त्यांना शिवसेनेमध्ये प्रवेश देऊन त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.