मनपा आयुक्त नरेश अकनूरी यांनी पदभार संभाळल्यावर कार्यालयात उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांना शिस्तीचे धडे देण्यास सुरुवात केली आहे.आज दि.१५ डिसेंबरला सकाळी १० वाजता मनपा आयुक्त अकनूरी कार्यालयात दाखल झाले, मात्र यावेळी अनेक कर्मचारी कार्यालयात आले नव्हते, कर्मचाऱ्यांसह अधिकारी कार्यालयीन वेळेत मनपात येत नसल्याचे निदर्शनास आल्यावर मनपा आयुक्तांनी थेट मनपाचे प्रवेशद्वार बंद केले.