विश्वासाचा फायदा घेत भाडेतत्त्वावर दोन चारचाकी वाहने घेऊन गेल्यानंतर ती परत न करता फसवणूक केल्याची घटना जळगाव शहरात उघडकीस आली आहे. आशाबाबा नगर येथील एका व्यक्तीसह त्यांच्या सहकाऱ्याची कार घेऊन संशयित आरोपी पसार झाला आहे. याप्रकरणी मंगळवारी १६ डिसेंबर रोजी दुपारी ४ वाजता रामानंदनगर पोलीस ठाण्यात विश्वासघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला.