नागपूर ग्रामीण: नागपुरात वादळी वाऱ्याचा तडाखा: सिग्नलवरील 'ग्रीन नेट' कोसळले; सुदैवाने जीवितहानी टळली
माहितीनुसार विदर्भातील कडक उन्हापासून नागपूरकरांना दिलासा मिळावा यासाठी महानगरपालिकेने शहरातील विविध प्रमुख चौकांमध्ये लाखो रुपये खर्च करून 'ग्रीन नेट' उभारल्या होत्या. मात्र, आज सायंकाळच्या सुमारास आलेल्या जोरदार वादळामुळे यातील अनेक ठिकाणच्या जाळ्या आणि त्यांचे सांगाडे रस्त्यावर कोसळले. या घटनेमुळे वाहतुकीचा खोळंबा झाला असून नागरिकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला.