दिग्रस: शेतकऱ्यांच्या न्यायासाठी शेतकरीपुत्रांचे तहसील कार्यालयात अर्धनग्न आंदोलन, तहसीलदारांमार्फत राज्य सरकारला पाठविले निवेदन
मागील दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे शेतकरी हतबल झाला आहे. सोयाबीन, कापूस, तूरसह अनेक पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊनही शासनाकडून तुटपुंजी मदत जाहीर करण्यात आली. त्यामुळे संतप्त शेतकरी पुत्रांनी आज दि. २९ सप्टेंबर रोजी दुपारी २ वाजताच्या दरम्यान दिग्रस येथे शेतकरी संघर्ष समितीच्या माध्यमातून अर्धनग्न आंदोलन करीत तहसिल कार्यालयात धडक दिली. सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणाच्या निषेधार्थ आंदोलनकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.