गोंदिया: विद्यार्थ्यांची कमी पटसंख्या दाखवून शाळा बंद करण्याचा शासन निर्णय मागे घ्या, जिल्हाधिकारी कार्यालय येथे विरोध प्रदर्शन
Gondiya, Gondia | Oct 16, 2025 विद्यार्थ्यांची कमी पटसंख्या दाखवून शाळा बंद करण्याचा शासन निर्णय मागे घ्यावा यासाठी शिक्षण बचाव समन्वय समितीद्वारे जिल्हाधिकारी कार्यालय येथे हस्ताक्षर आंदोलन विरोध प्रदर्शन व प्रमुख मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.सध्या विद्यार्थ्यांची कमी पटसंख्या हे कारण दाखवून शासन अनेक शाळा बंद करण्याचा निर्णय घेत आहे. हा निर्णय अत्यंत अन्यायकारक आणि शिक्षण विरोधी आहे. ग्रामीण भागातील तसेच गरजू विद्यार्थ्यांसाठी ही शाळा म्हणजे शिक्षणाचे एकमेव साधन आहे.