कर्जत: अंजप गावामधून बैल चोरी करून चोर फरार
शेतकऱ्याच्या बैलाचोरांनी पुन्हा एकदा घातला घाला
Karjat, Raigad | Nov 2, 2025 कर्जत तालुक्यातील अंजप गावामध्ये पुन्हा एकदा चोरीची घटना घडली आहे. अंजप गावामध्ये घरासमोरून बैल चोरीला गेल्याची घटना घडली आहे. चार चाकी गाडीमध्ये बैल चोरी करून फरार झाल्याची घटना घडली आहे.कर्जत तालुक्यामध्ये वारंवार अशा घटना घडत आहेत. अंजप गावामध्ये घरासमोर अंगणात बसलेले बैल असताना दोन चोर गाडीतून उतरून बैलासमोर ब्रेट पाव टाकून बैलाला पकडून गाडीमध्ये भरून घेऊन जाण्याचा प्रकार घडला आहे.