भारतीय संस्कृतीतील अजरामर महाकाव्ये असलेल्या रामायण आणि महाभारतातील नायिकांच्या अंतर्मनाचा वेध घेणारा 'गूज मनीचे' हा संशोधनाधारीत आणि प्रयोगशील नाट्यप्रयोग पनवेलमध्ये उत्साहात संपन्न झाला. नादकला थिएटर अँड फिल्म्स निर्मित या अभिनव नाटकाचा शुभारंभ आणि पहिला प्रयोग आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात पार पडला. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, ज्याला रसिक प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.