भोकरदन: दोन दुचाकींचा समोरासमोर भीषण अपघात नळणी फाट्यावरील घटना
आज दिनांक 6 मे 2026 वार बुधवार रोजी दुपारी 2 वाजेच्या सुमारास भोकरदन तालुक्यातील राजुर ते नळणी या मुख्य मार्गावर दोन दुचाकींचा समोरासमोर भीषण अपघात झाला आहे अपघात एवढा भीषण होता की दोन्हीही दुचाकी रोडच्या एका साईडला जाऊन पडल्या तर दुचाकी वरील असलेली दोघेजण हे गंभीर जखमी झाले आहे ,यावेळी त्यांना तात्काळ राजूर येथील सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून मात्र त्यांचे नावे कळू शकलेले नाही.