आमदार सुरेश धस यांचे स्वीय सहाय्यक आसाराम माने यांनी एका व्यक्तीला जीवे मारण्याची धमकी दिली आहे यात फिर्यादी संतोष धोंडीराम गायके या व्यक्तीने माने यांच्या पुतण्याला दीड लाख रुपये दिले मात्र काही केल्या मानेंचा पुतण्या चार वर्षांपासून हे पैसे देत नव्हता त्याला गायके यांनी पैसे कधी देणार असं विचारल्यानंतर थेट धसांचे स्वीय सहाय्यक माने यांनी गायके यांना फोनवरून अर्बच्च भाषेत शिवीगाळ केली या त्यांना जीवे मारण्याची देखील धमकी दिल्याचा गंभीर आरोप केला असून शिरूर ठाण्यात तक्रार देण्यात आली.