जालना: मंठा चौफुली परिसरातील गंगासागर अपार्टमेंटमध्ये वेश्या व्यवसायावर अनैतिक मानवीवाहतूक प्रतिबंधक पथकाचा छापा;दोघांवर गुन्हा
Jalna, Jalna | Jun 13, 2026 जालना शहरातील मंठा चौफुली येथील श्रीजी हॉटेलच्या पाठीमागे असलेल्या लक्ष्मीनगर परिसरातील गंगासागर अपार्टमेंटमध्ये सुरू असलेल्या कथित वेश्या व्यवसायावर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने छापा टाकून कारवाई केली. शनिवार दिनांक 13 जून 2026 रोजी दुपारी एक वाजता मिळालेल्या माहितीनुसार या कारवाईत एका महिलेसह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून एक आरोपी फरार झाला आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षास 12 जून 2026 रोजी गुप्त माहिती मिळाली होती.