लोहारा: धानुरी येथे अवैध गौणखनिज उत्खनन करणाऱ्या 4 ट्रॅक्टर व दोन जेसीबी वाहने महसुल प्रशासनाने केली जप्त
धानुरी येथे महसूल प्रशासनाने दि.25 जुलै रो सकाळी 11 वाजता अवैध गौणखनिज उत्खनन करणाऱ्या चार ट्रॅक्टर व दोन जेसीबी वाहने जप्त करत त्यांची तहसील कार्यालयात रवानगी केली आहे.धानुरी येथील सर्वे नंबर ६४० ही कारवाई करण्यात आली. या ठिकाणी दोन जेसीबीच्या सहाय्याने बेकायदेशीररीत्या गौणखनिजाचे उत्खनन सुरू होते. उत्खननानंतर तयार झालेल्या खनिजांचा चार ट्रॅक्टरद्वारे अवैध वाहतूक केली जात असल्याची गोपनीय माहिती महसूल प्रशासनाला मिळाल्यानंतर त्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन कारवाई केली