भिवंडी: भिवंडी हादरली! न्यायालयातून पळून आलेल्या आरोपीने पुन्हा सात वर्षीय मुलीवर अत्याचार करून केली हत्या,कुटुंबीयांचा आक्रोश
भिवंडी येथे एका सात वर्षाच्या चिमुरडीवर अमानुष अत्याचार करून तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सलामत अन्सारी नावाच्या आरोपीने न्यायालयातून पळून येऊन पुन्हा तेच कृत्य केले आहे. 2023 मध्ये सहा वर्षाच्या मुलीवर अत्याचार करून हत्या केली होती. त्याप्रकरणी त्याला न्यायालयात हजर करत असताना तो पसार झाला आणि पुन्हा भिवंडीत सात वर्षाच्या मुलीवरअत्याचार हत्या केली. याप्रकरणी मुलीच्या आई-वडिलांनी संताप व्यक्त करत कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी केली आहे.