अंबरनाथ: अंबरनाथ मध्ये हातात लोखंडी आणि लाकडी दांडके घेऊन चोरटे पोलिसांसारखी घालत होते गस्त, सीसीटीव्ही व्हिडिओमुळे परिसरात खळबळ
अंबरनाथ परिसरामध्ये चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. मागील काही दिवसांपूर्वी एकाच रात्री पाच ते सहा घरांमध्ये चोरीची घटना घडली होती. ही घटना ताजी असतानाच पुन्हा चोरट्यांचा धुमाकूळ सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आहे. अंबरनाथ परिसराच्या नेताजी मार्केट येथे पहाटेच्या सुमारास हातामध्ये लोखंडी आणि लाकडी दांडके घेऊन रेनकोट अंगावर घालून पोलिसांसारखी गस्त घालत चोरटे फिरताना पाहायला मिळाले. सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आल्यानंतर परिसरामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.