जळगाव: बिलवाडी गावात खून, जुन्या वादातून दोन कुटुंबांमध्ये हाणामारी, एकाचा मृत्यू; ११ जण जखमी
जळगाव तालुक्यातील बिलवाडी गावात जुन्या वादातून दोन कुटुंबांमध्ये झालेल्या हाणामारीत एकाचा मृत्यू झाला असून 11 जण जखमी झाले आहेत. रविवारी 14 सप्टेंबर रोजी दुपारी 1 वाजेच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेत एकनाथ निंबा गोपाळ (वय 55) यांचा जागीच मृत्यू झाला. जखमींपैकी एका महिलेची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. सर्व जखमींवर सध्या जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत.