मोहोळ: सीना नदीला पूरसदृश्य परिस्थिती; एकुरके परिसरातील पिकांचे मोठे नुकसान, पंचनामे करण्याची मागणी
Mohol, Solapur | Sep 17, 2025 सततच्या पावसामुळे तसेच सेना नदीवरील प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरल्याने मोहोळ तालुक्यातील सेना नदीला पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. नदी पूर्ण क्षमतेने वाहत असल्याने नदीकाठच्या गावांमध्ये पाणी शिरले असून शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. विशेषतः एकुरके गावातील नदीकाठच्या शेतजमिनीतील पिकांचे मोठे नुकसान झाल्याचे समोर आले आहे. ऊस, पेरू यासह इतर हंगामी पिके पाण्याखाली गेली असून शेतकरी हतबल झाले आहेत.