रावेर तालुक्यातील विवरा खुर्द येथील २१ वर्षीय हितेश सुनील पाटील या तरुणाचा मृतदेह बुधवारी १७ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता भुसावळ येथील तापी नदीच्या पात्रात आढळून आल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. हितेशच्या मृत्यूबाबत नातेवाईकांनी घातपाताचा संशय व्यक्त करत निंभोरा पोलीस ठाण्यात मृतदेहासह दोन तास ठिय्या आंदोलन केले.