अकोला : नोकरी लावून देण्याचे खोटे आश्वासन देत तीन महाठकांनी सेवानिवृत्त शिक्षक धांडे (वय ५९) यांची तब्बल १५ लाख ५० हजार रुपयांची फसवणूक केली. मुलगा व सुनेला नोकरी मिळवून देण्याच्या आमिषाने आरोपींनी कष्टाची बचत लुबाडली. याप्रकरणी धांडे यांनी खदान पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलिसांनी तपास सुरू केला असल्याची माहिती 23 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 7 वाजता मिळाली आहे.