अंजनगाव सुर्जी: येवदा पोलीस स्टेशन हद्दीतून अल्पवयीन मुलीस फूस लावून पळविले;अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल
येवदा पोलीस स्टेशन हद्दीतील एका गावातून एका अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याची घटना घडली.४ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री १ वाजताच्या दरम्यान घडल्याची तक्रार येवदा पोलीसात दाखल करण्यात आली आहे.फिर्यादी महिलेच्या पुतणीला कोणीतरी अज्ञात व्यक्तीने पळवून नेले.पुतनीने फिर्यादी फोन करून घरी येण्याबाबत विचारले असता घरी येण्यास वेळ लागेल असे फिर्यादी हिने सांगून फोन कट केला.फिर्यादी रात्री घरी पोहोचली असता तिला पुतणी घरात दिसली नाही, परिसरात तसेच नातेवाईकांकडे चौकशी केली असता ती मिळाली नाही.