संक्रांती सण आनंद, उत्साह आणि सामाजिक सलोख्याचे प्रतीक असला तरी नायलॉन मांजामुळे या सणाला गालबोट लागण्याची भीती व्यक्त होत आहे. नायलॉन मांजा हा केवळ बेकायदेशीरच नाही तर तो मानवी जीवन, पशुपक्षी आणि पर्यावरणासाठी अत्यंत घातक असल्याने नागरिकांनी काळजी घ्यावे असे आवाहन आज ३० डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता कोपरगाव नगरपरिषदेचे नगराध्यक्ष पराग संधान यांनी केले आहे.