भद्रावती: ५ नोव्हेंबर पासून निप्पान प्रकल्पग्रस्तांचे आमरण ऊपोषण.
मैकवील प्लैंट येथील पत्रपरिषदेतील माहिती.
निप्पान साठी अधिग्रहित केलेल्या जमिनीवर एरा कंपणीचे प्रकल्प येऊ घातला आहे. मात्र सानुग्राह मदत,त्रीपक्षीय करार व कुटुंबातील सदस्यांना रोजगार या मागण्यांना घेऊन निप्पान प्रकल्पग्रस्तांतर्फे धरणे,संप असे आंदोलने करण्यात आले आहे.मात्र शासनाने याकडे दुर्लक्ष केले असल्याने येत्या ५ नोव्हेंबर पासून गांधी चौकात आमरण ऊपोषण करण्यात येत असल्याची माहिती निप्पान प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीतर्फे मैकवील प्लैंट येथे घेण्यात आलेल्या पत्रपरिषदेतून देण्यात आली आहे.