जळगाव जामोद: सुनगाव येथे येलो मोझॅक व संत्रा फळगळ चा प्रादुर्भाव, शेतकऱ्यांच्या वतीने तालुका कृषी अधिकारी यांना निवेदन
सुनगाव येथे सोयाबीन पिकावर येलो मोझॅक, व संत्रा पिकावर फळगडचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकऱ्यांनी या संदर्भात तालुका कृषी अधिकारी यांना निवेदन सादर केले आहे. सततचा पाऊस चालू असल्याने संत्रा पिकाची फळगळ झाली आहे तसेच सोयाबीन पिकावर सुद्धा येलो मोजॅकचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. यासंदर्भात तालुका कृषी अधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे.