हवेली: लोणी काळभोर येथे वायरमनला खल्लास करून टाकण्याची धमकी तर कुटुंबाला बेदम मारहाण; तिघांवर गुन्हा दाखल
Haveli, Pune | Nov 29, 2025 दारू पीत असल्याचे नाव सांगितल्याच्या संशयावरून वायरमनला खल्लास करून टाकण्याची धमकी देऊन कुटुंबाला मारहाण (Fighting) केल्याची घटना घडली आहे. ही घटना लोणी काळभोर (ता.हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील सिद्राम मळा परिसरात गुरुवारी (ता.27) रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास घडली आहे.