सदर पोलिसांची पथक पेट्रोलिंग करीत असताना मंगळवारी बाजार परिसरात हातात शस्त्र घेऊन लोकांना धमकविणाऱ्या आरोपीला पोलिसांनी घेराव घालून ताब्यात घेतले आहे. अटकेतील आरोपीचे नाव कौशिक गेडाम असे सांगण्यात आले असून त्याच्या ताब्यातून एक लोखंडी चाकू किंमत 300 रुपये जप्त करण्यात आले आहे. आरोपी दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने तसेच दखलपात्र गुन्हा करण्याच्या उद्देशाने लोखंडी चाकू बाळगून मिळून आल्याने आरोपीला अटक करण्यात आली.