अमरावती: रमाबाई आंबेडकर नगर येथे चक्कर आल्याने ५५ वर्षीय पुरुषाचा मृत्यू; गाडगे नगर ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद
शहरातील रमाबाई आंबेडकर नगर येथे राहणारे भारत दिगांगर गवई (वय ५५) यांना घरी अचानक चक्कर आल्याने मृत्यू झाला. या प्रकरणी गाडगेनगर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भारत गवई हे २१ सप्टेंबर रोजी सकाळपासून घरी होते. दुपारी अचानक त्यांना चक्कर आली व ते बेशुद्ध अवस्थेत कोसळले. नातेवाईकांनी त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले. या संदर्भात इविन चौकीकडून मेमो गाडगेनगर पोलिसांकडे प्राप्त झाला. त्यानुसार प