जालना: आयुक्त शर्मा कडून मनपा शाळांच्या इमारतींची पाहणी की केवळ फोटोसेशन? नागरिकांकडून प्रश्न उपस्थित
Jalna, Jalna | May 4, 2026 जालना शहर महानगरपालिकेकडून मनपा शाळांच्या सक्षमीकरणाच्या नावाखाली नवीन इमारतींसाठी जागांची पाहणी करण्यात आली असली, तरी प्रत्यक्षात शहरातील अनेक शाळांची अवस्था दयनीय असल्याचा आरोप नागरिक आणि पालकांकडून केला जात आहे. महानगरपालिका आयुक्त अंजली शर्मा यांनी ब्राह्मण गल्ली (शकुंतला नगर) व रंगार खिडकी येथील शाळांना भेट देऊन नवीन इमारतींसाठी जागांची पाहणी केली. मात्र अनेक वर्षांपासून मनपा शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता, स्वच्छतेचा अभाव, तुटकी बाके, अपुरी शौचालय व्यवस्था आणि विद्यार्थ्यांसाठी मूल