नागपूर शहर: हातात चाकू घेऊन आरोपींचा रस्त्यावर आतंक, जरीपटका परिसरात दहशतीचे वातावरण सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल
नागपूरच्या जरीपटका परिसरात काही आरोपींनी हातात धारदार चाकू घेऊन रस्त्यावर अक्षरशः दहशत निर्माण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले असून, त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे आणि संतापाचे वातावरण पसरले आहे.व्हायरल झालेल्या फुटेजमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की, काही तरुण हातात उघडपणे चाकू घेऊन रस्त्यावरून फिरत आहेत. त्यांचा हा अविर्भाव एखाद्याला धमकावण्याचा किंवा गंभीर गुन्हा करण्याचा असल्यासारखा दिसत आहे.