हवेली: ट्रान्सफॉर्मरमधील तांब्याच्या तारा चोरणारा आरोपी जेरबंद; चार गुन्ह्यांचा पर्दाफाश, गुन्हे शाखा युनिट 6ची कारवाई
Haveli, Pune | Nov 3, 2025 वाघोली आणि लोणीकंद परिसरात ट्रान्सफॉर्मर (रोहीत्र) मधील तांब्याच्या तारा चोरी करणाऱ्या आरोपीला गुन्हे शाखा युनिट ६ ने अटक केली आहे. अंशुमन राम केवल यादव (वय १९, रा. शिरुर बायपास रोड, शिरुर, ता.शिरुर, पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.