जालना: बदनापूर पोलीसांच्या हद्दीत चंदनझिरा पोलिसांची मोठी कारवाई; सोमठाणा फाटा येथे गुटखा भरलेले वाहन जप्त
Jalna, Jalna | May 20, 2026 जालना जिल्ह्यात अवैध धंद्यांविरोधात सुरू असलेल्या मोहिमेला वेग आला असून चंदनझिरा पोलीस स्टेशनच्या पथकाने गुटखा तस्करीविरोधात मोठी कारवाई केली आहे.विशेष म्हणजे बदनापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चंदनझीरा पोलीसांनी सोमठाणा फाटा,ता.बदनापूर येथे पोलिसांनी सापळा रचून विमल व राजनिवास गुटखा भरलेले वाहन जप्त केले.बुधवार दि.20 मे 2026 रोजी सायंकाळी 5 वाजता मिळालेल्या माहितीनुसार या कारवाईमुळे गुटखा तस्करी करणार्यांमध्ये खळबळ उडाली आहे.अधीक्षक तेगबीर सिंह संधू यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई केली