मोहोळ: सीना नदीची पाणी पातळी वाढण्याची शक्यता; नागरिकांनी जीव वाचवण्याला प्राधान्य द्यावे : राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष उमेश पाटील
Mohol, Solapur | Sep 27, 2025 सोलापूर जिल्ह्यात काल शुक्रवारपासून परत पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. त्याचबरोबर सीना नदी पात्रात अनेक ठिकाणी पाऊस जोरदार पडत आहे. त्यामुळे सीना नदी पात्रातील पाणी पातळी परत वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदीकाठच्या शेतकऱ्यांनी आपल्या घरी तसेच नदीपात्रामध्ये जाऊ नये. आपला जीव वाचवण्याला प्राधान्य द्यावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांनी आज शनिवार दिनांक 27 सप्टेंबर 2025 रोजी दुपारी बारा वाजता सोशल मीडियाद्वारे केले आहे.