धुळे महापालिकेला मिळणार व्यापारी संकुलांमधून सुमारे अडीच कोटींचे उत्पन्न
Dhule, Dhule | Jul 6, 2026 धुळे महानगरपालिकेच्या मालकीच्या BOLT तत्त्वावर उभारण्यात आलेल्या पारोळा रोडवरील आर. आर. पाटील व्यापारी संकुल आणि मालेगाव रोडवरील छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुल येथील गाळ्यांच्या भाडेकरारानुसार धुळे महानगरपालिकेला अंदाजे २ कोटी ५० लाख रुपयांचे उत्पन्न मिळणार आहे. या दोन्ही व्यापारी संकुलांतील गाळ्यांच्या भाडेनिश्चितीबाबत सन २०१७ पासून विकासक, संबंधित विभागाचे अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांच्या वेळोवेळी बैठका घेण्यात आल्या होत्या. मात्र भाड्याचा दर, आकारणीची तारीख तसेच करारातील अटी-शर्ती याबाबत अंतिम निर्णय न झाल्याने सन २०१६ पासून भाडे आकारणीची प्रक्रिया प्रलंबित होती. महानगरपालिकेचे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी आयुक्त श्री. नि