जुनेगाव या गावात वंजारी वाडा आहे. या वंजारी वाडा भागात चेतन गजानन कासार वय १९ हा तरुण आपल्या घरी होता. तो त्याच्या मित्रांना सांगून गेला की मला खूप टेन्शन आहे मी बाहेर जाऊन येतो. असे सांगून बाहेर गेलेला हा तरुण नंतर घरी परत आलाच नाही. याप्रकरणी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार नोंदवण्यात आली आहे.