भंडारा नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचारादरम्यान काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ता हनुमंत पवार यांनी भाजपचे आमदार डॉ. परिणय फुके आणि शिवसेनेचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. भंडारा शहरातील किसान चौक शुक्रवारी येथे दिनांक 27 नोव्हेंबर रोजी रात्री 8 वाजता दरम्यान आयोजित जाहीर सभेला संबोधित करताना पवार कडाडले. त्यांनी दोन्ही आमदारांना त्यांच्या 'फसवा-फसवी'च्या राजकारणावरून घेरले. पवार म्हणाले की, राज्यात भाजप आणि शिवसेना हातात हात घालून सत्तेचा उपभोग घेत आहेत....