जळगाव: आर.एल. चौफुली जवळ दुचाकीच्या धडकेत प्रौढ जखमी; एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल
जळगाव शहरातील आर.एल. चौफुली येथे पायी जात असलेल्या एकाला भरदार दुचाकीने समोरून जोरदार धडक दिल्याने गंभीर दुखापत केल्याची घटना 30 सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजता घडली होती. या संदर्भात रविवारी ५ ऑक्टोबर रोजी दुपारी १ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात दुचाकी धारकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.